: मुंबई राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. तर अद्यापही काही जिल्ह्यात नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी पावसाने जोरदार हजेज्यामुळे या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर कोकणाला देखील याआधी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. पण पुन्हा एकदा आता हवामान विभागाकडून कोकणाल अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाला अतिवृष्टीचा तर विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे घाट माथा आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर विकेंडमध्ये कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. ज्यानुसार कोकण वगळता राज्यात इतरत्र पावसाचा जोर कमी असल्याचे यला मिळाले.
तसेच, 10 ते 13 जुलै या कालावधीत कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागांत सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज देखील आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहरासह, उपनगर, ठाणे, कल्याण या भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे यला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा गर्मी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे काही भागांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार असून 15 जुलैपर्यंत कोकणात चांगला, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या देशातील हिमाचल प्रदेश या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून या ठिकाणी आतापर्यंत 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कुल्लू-मनाली व अनेक जिल्ह्यातील घरेच्या घरे वाहून गेल्याने अनेक नागरिक बेघर झाले आहेत. तसेच, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून दिल्लीमधील शाळांना चार दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.री लावली.