सलग दुसऱ्या वर्षी मला शासकीय पूजेचा मान, मी भाग्यवान समजतो – मुख्यमंत्री शिंदे

0
91
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पूजेचा हा मान मिळाला.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

सलग दुसऱ्या वर्षी मला पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला, मी खूप भाग्यवान समजतो, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.

आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने लोक पायी चालत येत असतात. आज आपण पाहतो संपूर्ण पंढरपूर पांडुरंगमय झालंय, वारकरीमय झालंय. सगळीकडं पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या ऐकाला मिळत आहे.

पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही पांडुरंगाकडं काय मागितलं? मी बळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे, असं साकडं घातलं. आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात काम थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत.

आमच्या सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. 15 लाख वारकऱ्यांचा विमा देखील काढला आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे हे गेल्या २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत आहेत. भाऊसाहेब व्यवसायानं शेती करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here