शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी जिल्हानिहाय ११ कंपन्या, तीन वर्षांसाठी योजना राबविण्यास मान्यता

0
149
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई – राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे.

यंदापासून एक रुपयात पीक विमा व कापणी पश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाणार आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेच्या नवीन कार्यपद्धतीनुसार सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

विमा हप्ता सरकार भरणार
n या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रकमेतून एक रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे.
n या योजनेसाठी याआधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती.

योजना पुढील तीन वर्षांसाठी : या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर आलेल्या कंपन्यांमधून ११ कंपन्या निश्चित केल्या असून, खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

जिल्हा आणि निश्चित केलेल्या कंपन्या
n अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.
n परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.
n जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड
n नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.
n छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कं.
n वाशिम, बुलढाणा,
सांगली, नंदुरबार :
भारतीय कृषी विमा कं.
n हिंगोली, अकोला,
धुळे, पुणे : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि
n यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
n धाराशिव : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
n लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि.
n बीड : भारतीय
कृषी विमा कंपनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here