16.7 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

- Advertisement -

मुंबई – आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जून ते ५ जुलै या कालावधीत या गाड्या विविध आगारांतून सोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी २०० बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंढरपूरची आषाढी यात्रेनिमित्त भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने पंढरपूर यात्रेच्या जादा वाहतुकीचा आढावा घेतला. यावेळी सुमारे ५००० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. औरंगाबादमधून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे गाड्यांचे नियोजन आहे.

चार तात्पुरती स्थानके उभारणार
प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरत्या बस स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.

बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस
१. चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
२. भीमा यात्रा देगाव औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
३. विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
४. पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

- Advertisement -

Related Articles

Latest Articles