17.4 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

निवृत्तीनाथ महाराज पालखी अंतिम टप्प्यात; करकंबच्या रिंगण सोहळ्यात भक्तीचा महापूर, वरूण राजाचीही जोरदार हजेरी

- Advertisement -

नाशिक : सोलापूर जिल्ह्यातील दगडी अकोला येथे संत निवृत्तीनाथ रथ मुक्कामी होता.रविवारी सकाळी ७:३० वाजता दगडी अकोला येथून पालखीने प्रस्थान ठेवले व परिते या गावी पालखी थोड्या कालावधीसाठी विसावली. याठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या चांदीच्या रथाला आंब्याच्या फळाचे सुंदर तोरण बनविण्यात आले. तिथून पुढे पालखी करकंब या ठिकाणी आली. सकाळपासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते. वारकरी गेल्या २२ दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस उगवला. आकाशात काळे ढग जमा झाले होते. रिंगण सोहळा सुरू होताच पावसाला प्रारंभ झाला. वारकर्‍यांनी मनापासून दिलेली हाक पांडुरंगाने ऐकली. वरूण राजाने मनसोक्त जलाभिषेक केला.

- Advertisement -

प्रेम. अमृताची धारवाहे । देवाही समोर ॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती घेत वैष्णव जलाभिषेक व भक्ती रसात न्हावून निघाले. करकंब येथील रिंगण सोहळ्यात सुमारे ७० हजार वारकरी उपस्थित होते. सुरुवातीला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकर्‍यांनी व झेंडे पताका मिरवत वारकर्‍यांनी रिंगणाला प्रदक्षिणा मारली. देवाचा अश्व व स्वाराचा अश्व यांनाही रिंगणाचा मार्ग सुरुवातीला दाखवला गेला. त्यानंतर वारकर्‍यांनी फेर धरत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत रिंगण सोहळ्याला प्रारंभ केला.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles