उमरखेड येथील रोजगार मेळाव्यात 197 उमेदवारांची प्राथमिक निवड

0
36
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

यवतमाळ,

जिल्हा कौशल्य विकास रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे आयोजन करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यामध्ये 197 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली असून 32 उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर वितरित करण्यात आले.

मारुती सुझुकी मोटर्स प्रा. लि, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ, व्हेरॉक इंजिनिअरिंग, औरंगाबाद, क्वेस कॉर्प लि. पुणे, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, यवतमाळ इत्यादी नामांकित कंपन्या तसेच बँक यांनी या  रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला. या कंपन्यात 1 हजार 747 रिक्त पदाकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच या रोजगार मेळाव्या करिता जिल्ह्यातील 394 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यामधील 197 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. तर 32 उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर वितरित करण्यात आले.

यावेळी (Rojgar melava) रोजगार मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीमध्ये उपस्थित होण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेडचे प्राचार्य पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोजगार मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ तसेच संत रोहिदास चर्मकार उद्योग महामंडळ यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here