एकिकडे बीएमसी घोटळ्यामुळे राज्यात राजकारण तापलं असतानाच मंत्रालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचलनालय कार्यालयातून स्टुडिओ अद्यावतीकरणाची फाईल गहाळ झाली आहे. अज्ञात इसमाने फाईल नष्ट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या उपसंचालकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मंत्रालयाच्या तळमजल्यावर शासनाच्या विविध योजनांच्या चित्रफिती तसेच मंत्र्यांच्या आणि सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचे चित्रीकरण करण्यासाठी 2015 मध्ये बांधण्यात आला होता. दरम्यान, कार्यालयातील नस्तीचे वर्गीकरण करत असताना स्टुडीओच्या अदययावतीकरणाची फाईल गहाळ झाल्याचं लक्षात आल.
गहाळ झालेल्या फाईलमध्ये
सदर स्टुडीओची शासनाकडुन मान्यता घेण्यापासुन ते उभारणी करण्यापर्यतची सर्व कागदपत्रे (शासनाला पाठवलेला प्रस्ताव, शासनमान्यता, टेंडर प्रक्रीया इत्यादी. स्टुडीओचे अदययावतीकरणाची ही फाईल आहे.