ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

कोणालाही जमलं नाही ते भवानी देवीनं करून दाखवलं; चीनमध्ये फडकवला भारताचा झेंडा


भारताची ऑलिम्पिकपटू भवानी देवीने फेन्सिंगमध्ये इतिहास रचला. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने सेमी फायनल गाठली आहे.

याचबरोबर तिचे पदक नक्की झाले आहे. एशियन फेन्सिंग चॅम्पियशिपमध्ये यापूर्वी भारताच्या कोणत्याही फेन्सिंगपटूला पदक पटकावता आले नव्हते. हा इतिहास भवानी देवीने रचला.

भवानी देवीने जपानची गतवेळची वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी इमुराचा क्वार्टर फायनलमध्ये 15 – 10 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. मात्र सेमी फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या झायनाब दायिबेकोव्हाने भवानी देवीचा 14 – 15 असा पराभव केल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *