‘आदिपुरुष’च्या ‘जय श्रीराम’ गाण्याने जिंकलं चाहत्यांचं मन!

0
156
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास अभिनित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

या गाण्याचे शीर्षक ‘जय श्री राम’ असे ठेवण्यात आले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘जय श्री राम’ हे केवळ गाणे नाही, तर देशभरातील १२० कोटी लोकांच्या भावना आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत. या गाण्याच्या रिलीजनंतर आता चाहत्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला आहे.

‘जय श्री राम’ या गाण्यावर चाहतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. चित्रपटाच्या या गाण्याचा पूर्ण भाग अद्याप रिलीज झालेला नाही. सध्या केवळ १ मिनिट ४ सेकंदाचे गाणेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याने चाहत्यांना वेगळाच आनंद दिला आहे. या गाण्यातील जय श्री रामचा नाद ऐकून सोशल मीडियावरील चाहते रामभक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत. या गाण्यात भगवान रामाची स्तुती करण्यात आली असून, आतापासूनच चाहत्यांची उत्सुकता वाढताना दिसत आहे.

एकीकडे या गाण्याचे तुफान कौतुक होत असतानाच, दुसरीकडे या गाण्याचा इतकासा भागच का रिलीज करण्यात आला? अशी तक्रार काही चाहते करत आहेत. साधारणपणे चित्रपटातील गाण्याची लांबी ३-४ मिनिटांची असते. मात्र, हे गाणे केवळ एक मिनिटाचे असून, ही झलक चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आली आहे. तसेच, या गाण्याचे व्हिडीओ व्हर्जन अद्याप रिलीज करण्यात आलेले नाही. या गाण्याचे व्हिडीओ व्हर्जनही लवकरच प्रदर्शित करावे, अशी विनंती चाहते करत आहेत.

‘आदिपुरूष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ हे गाणे प्रसिद्ध गीतकार मनोज मुंताशीर यांनी लिहिले आहे. या गाण्याला अजय-अतुल या शानदार जोडीने संगीत दिले आहे. या चित्रपटाची आणखी काही गाणीही रिलीज झाली आहेत, जी चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. ओम राऊत याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरबाबत झालेला गोंधळ लक्षात घेऊन ट्रेलर सुधारण्यात आला आहे. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here