पुणे जेवायला जातो सांगून गेला तो कायमचाच..

0
130
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणेःतरुणाची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे.

माहिती पोलिसांना (काल) शनिवारी सकाळी मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळगाव अमरावती) असं मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा अमरावतीचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. सोबत दुचाकी देखील होती. घटनास्थळाचा पंचनामा करून लोणीकंद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून घटनास्थळी न्याय वैद्यकीय पथक तसेच श्वानपथक यांना पाचारण करण्यात आलं होतं.

गौरव उरावी हा खराडी येथील आयटी कंपनीमध्ये नोकरी करत होता. तसेच, तो खराडी येथे मित्रांसोबत पीजीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवायला जातो, म्हणून मित्रांना सांगून गौरव निघाला. मात्र, रात्री पुन्हा तो आला नाही. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरवचा गळा चिरलेला मृतदेह सापडला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. गौरवचा अत्यंत अमानुषपणे गळा चिरून निर्घुणपणे खून का करण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here