16.7 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

‘पफर’ मासा खाल्ल्याने ८३ वर्षीय पत्नीचा मृत्यू; पती कोमात

- Advertisement -

मलेशियातील एका ८३ वर्षीय महिलेचा ‘पफर’ हा विशिष्ट प्रकारचा मासा खाल्ल्याने मृत्यू झाला, तर तिच्या पतीवर अजून अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात दोघा पती-पत्नीने मरीन पफर फिश खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. या पफर फिशमध्ये काही प्रमाणात घातक विषारी घटक असतात. हा मासा खाल्ल्यानंतर ही महिला आजारी पडली आणि तिला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

या वयोवृद्ध जोडप्याच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी मलेशियातील एका दुकानातून पफर फिश विकत घेतला होता. वर्षोनुवर्षे त्याच दुकानातून ते मासे खरेदी करत होते. २५ मार्चलाही त्यांनी याच दुकानातून पफर फिश डेलिकसी विकत घेतली होती. त्यानंतर हे मासे खाल्यानंतर काही वेळातच महिलेच्या नवऱ्याच्या लक्षात आले की, तिला उलट्या होत असून, श्वास घेण्यास त्रास होत आहे. नंतर महिलेच्या पतीलाही हाच त्रास होऊ जाणवू लागला.

या दाम्पत्यांच्या मुलाने तात्काळ त्यांना रूग्णायलात दाखल केले. परंतु रूग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. तर महिलेच्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर महिलेच्या मृत्यू अहवालात विषारी अन्न प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. पती अजूनही कोमात आहे आणि डॉक्टर सतत त्यांच्या उपचारात गुंतले असल्याची माहिती या दाम्पत्याच्या मुलाने दिली आहे.

‘पफर’मध्ये आढळले घातक-विषारी घटक

मीडिया रिपोर्ट्सनुसीर, अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे की, जपानी डिश पफर फिशमध्ये घातक विष आढळते. या माशात टेट्रोडोटॉक्सिन (tetrodotoxin) आणि सॅक्सिटॉक्सिन (saxitoxin) आढळतात. हे विषारी विष शिजवून आणि गोठवूनही नष्ट होऊ शकत नाही. ही डिश जपानमध्ये खूप आवडती मानली जाते आणि केवळ कुशल शेफच ते बनवू शकतात.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles