6.6 C
New York
Friday, March 29, 2024

Buy now

एका रात्रीत कोट्यधीश बनला वेटर, तब्बल १० कोटी मिळाले अन् मग काय केलं..

- Advertisement -

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आणि तो एका रात्रीत कोट्यधीश बनला. त्याच्याकडे १० कोटी रुपये आले. पण लक्षवेधी गोष्ट अशी की इतके पैसे आल्यानंतरही त्यानं आपली नोकरी सोडली नाही.

आपण नोकरी सोडली तर रेस्टॉरंटमधील सहकाऱ्यांची खूप आठवण येईल त्यामुळे नोकरी न सोडण्याचा निर्णय त्यानं घेतला.

‘द सन’च्या वृत्तानुसार, यूकेच्या कार्डिफ येथे राहणाऱ्या ल्यूक पिटार्ड गेल्या काही वर्षांपासून मॅकडोनल्ड्समध्ये काम करतो. याच दरम्यान त्याला १३ कोटी १८ लाख रुपयांची लॉटरली लागली. नॅशनल लॉटरीचा विजेता बनल्यानंतर त्याचं नशीब चमकलं. पण त्यानं आपली नोकरी सोडली नाही.

२००६ साली घडलेल्या या घटनेची माहिती सांगताना ल्यूक सांगतो की त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड एमा कॉक्स देखील नोकरी करत होती. लॉटरी जिंकल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मग अडीच कोटी रुपये प्रॉपर्टी खरेदी करण्यावर खर्च केले.

कोट्यवधींचा मालक, पण वेटरची नोकरी सोडली नाही
ल्यूक आणि एमा परदेश दौऱ्यावर देखील गेले. लॉटरीतील काही रक्कम त्यांनी गुंतवणूक केली आणि वर्षभराच्या कालावधीनंतर ल्यूक पुन्हा नोकरीवर परतला. पुन्हा वेटरचं काम करताना पाहून ल्यूकच्या सहकाऱ्यांनाही धक्का बसला. कोट्यधीश झाल्यानंतर ल्यूक काही वेटरचं काम करेल अशी अपेक्षा सहकाऱ्यांना नव्हती. पण ल्यूकनं आपले पाय अजूनही जमिनीवरच आहेत हे कृतीतून सिद्ध करुन दाखवलं.

“मी कोट्यधीश होण्याआधी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करायचो. मला ते काम आवडायचं. आज श्रीमंत असलो तरी कामातून आनंद मिळतो. सहकारी कर्मचारी देखील आमच्या लग्नाला आले होते. मी नेहमी त्यांच्यासोबत संपर्कात राहत आलो आहे. मग मीच विचार केला की पुन्हा नोकरी का करायची नाही?”, असं ल्यूकनं सांगितलं.

ल्यूकची पत्नी एमानंही त्याच्या नोकरीवर परतण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. “आम्ही दोघंही मॅकडॉनल्ड्समध्ये काम करायचो. दोघांनाही काम करण्याचा आनंद घेता येत होता. तिथं आमचे चांगले मित्र आहेत. ल्यूक कामावर परतल्याचा मॅनेजरलाही आनंद झाला.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles