18.4 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

मटनावरून झालेल्या भांडणात,नवऱ्याने बायकोचा चिरला गळा, पोरीनं पोलिसांना सगळं सांगितलं

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील रोरावार परिसरात निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे.
आपल्या आईला मारून पळून जाणाऱ्या बापाविरोधात मुलांनी आरडाओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या अनेक लोकांनी आरोपीस पकडले आहे. प्रचंड गोंधळात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडण्यात आले आहे. सगीर आणि त्याची पत्नी गुड्डो हे 3 मुलांसह राहतात. घरात मटण आणण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला, यावरून चाकूने गळा कापून खून करण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी जवळ असलेल्या मुलीने ही घटना पाहिली होती. यावेळी ती मुलगी म्हणाली की, पप्पा आणि मम्मीमध्ये मांसावरून वाद झाला. वाद इतका वाढला की वडिलांनी आईची हत्या केली आणि घटनेनंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला.

- Advertisement -

यावेळी आमचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. आजूबाजूच्या लोकांनी वडिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला अटक केले आहे.
प्रकरणाची माहिती देताना एसपी सिटी कुलदीप गुणवत म्हणाले की, रोरावार भागातील महमूद नगर येथून आरोपी पतीला अटक आली आहे. यासोबतच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे इतर बाबींचा तपास केला जाईल.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles