अनिसच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी अशोक फपाळ उपाध्यक्षपदी प्रा.श्रीनिवास काकडे तर कार्याध्यक्षपदी तेजस शिंदे

0
160
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अनिसच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी अशोक फपाळ उपाध्यक्षपदी प्रा.श्रीनिवास काकडे तर कार्याध्यक्षपदी तेजस शिंदे

वडवणी : (गितांजली लव्हाळे ) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी वडवणी येथील भुमीपुत्र फिल्म प्रोडक्शनचे निर्माते तथा न्यूज २४ चॅनेलचे कार्यकारी संपादक अशोक फपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी दीपक वडमारे व प्राध्यापक श्रीनिवास काकडे, कार्याध्यक्षपदी तेजस शिंदे, प्रधान सचिव प्राध्यापक रामहरी मायकर यांच्याही निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या.वडवणी येथील महात्मा फुले चौकात शौनशौर्य तेल उद्योग केंद्र सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक रामहरी मायकर होते तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णासाहेब मस्के,प्राध्यापक हनुमंत मात्रे, पत्रकार रामेश्वर गोंडे,पत्रकार गीतांजली लव्हाळे, रुक्‍मीनबाई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ओम पुरी, पत्रकार लहू खारगे यांची उपस्थिती होती.यावेळी वडवणी तालुक्याची कार्यकारणी निवडी संदर्भात चर्चा होऊन तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते वडवणी येथील भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनचे निर्माते तथा न्यूज २४चॅनेलचे कार्यकारी संपादक सामाजिक कार्यकर्ते अशोक फापाळ यांची निवड करण्यात आली.या निवडीनंतर सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी प्रख्यात चित्रपट निर्देशक एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक संघटनेचे नेते प्राध्यापक श्रीनिवास काकडे व दीपक वडमारे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सहशिक्षक तेजस शिंदे, प्रधान सचिव म्हणून वडवणी येथील प्रख्यात प्राध्यापक रामहरी मायकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार रामेश्वर गोंडे व पत्रकार हनुमंत मात्रे, महिला कार्यवाहक म्हणून महिला पत्रकार गीतांजली लव्हाळे, शिंदे यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते ओम पुरी, अण्णासाहेब मस्के, यांचीही कार्यकारिणीवर मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे आभार पत्रकार रामेश्वर गोंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here