वडवणी येथील छत्रपती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहलीतील निसर्गरम्य वातावरणात स्वच्छता अभियान

0
94

वडवणी येथील छत्रपती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहलीतील निसर्गरम्य वातावरणात स्वच्छता अभियान ही राबविले 

वडवणी : (गितांजली लव्हाळे ) शैक्षणिक क्षेत्रात अव्वल नाव मिळविलेल्या वडवणी येथील छत्रपती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय शैक्षणिक सहल चिंचवडगाव येथील परमार्थ आश्रमात काढण्यात आली होती. सध्याच्या कडक उन्हाच्या वातावरणात सुद्धा विद्यार्थ्यांनी आश्रम परिसरात असलेले निसर्गरम्य, थंड वातावरण पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसून येत होता. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गाचेही सखोल ज्ञान व्हावे आणि विद्यार्थ्याचे नाते निसर्गाशी जोडले जावे या दृष्टीकोनातून या एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चा एक भाग म्हणून आश्रम परिसरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला.या सहलीत शाळेचे मुख्याध्यापक आवळे,गीतांजली लव्हाळे,शिंदे, आडे,शीतल मस्के,डोंगरे, मोरे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here