मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत स्टुडिओला आग, VIDEO

0
144

मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली. फिल्म सिटीमध्ये ‘गम है किसी के प्यार में’ च्या स्टुडिओला आग लागली, या आगीत 4 ते 5 स्टुडिओ जळून खाक झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका गम है किसी के प्यार में या मालिकेच्याच्या सेटवर शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. मुंबईतील गोरेगावमध्ये या मालिकेचा सेट आहे. याच ठिकाणी इतर अनेक मालिकेचीही सेट आहे.

 

पहिले ‘गम है किसी के प्यार में’ च्या सेटला आग लागली. बघता बघता आग पसरत गेली आणि शेजारी असलेले इतर 3 ते 4 सेट आगीच्या भक्ष्य स्थानी सापडले. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग

यावेळी 1 हजारांहून अधिक लोक येथे उपस्थित होते. त्यामुळे तातडीने कर्मचारी इतर कलाकारांनी घटनास्थळावरून जीव मुठीत धरून बाहेर धाव घेतली.

आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीच्या घटनेत निष्काळजीपणाची बाब समोर येत आहे.आग विझवण्यासाठी सेटवर कोणतीही अग्निरोधक उपकरण नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, आगीने दोन मालिकांचे सेट जळून खाक झाले आहेत. दोन्ही मालिकांचा सेट ‘गम है किसी के प्यार में’ या शोच्या सेटच्या अगदी जवळ होते.

सुदैवाने या आगीच कुणालाही दुखापत झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here