आदीवाशी अनाथ मुलासोबत श्री रामजी नेहरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
167

आदीवाशी अनाथ मुलासोबत केला श्री रामजी नेहरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड : बीड ( सखाराम पोहिकर ) माजलगाव तालुक्यातील मौजे गव्हाण थंडी येथील माजी उपसंरपच तथा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभाग प्रमुख श्री रामजी नेहरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड तालुक्यातील वासनवाडी परिसरातील पारधी समाजातील मुला मुलीची निवासी आश्रम शाळा आहे या शाळेचे स्थापक श्री सुधीरजी भोसले हे गेल्या सन 2011 पासून हि शाळा चालवतात त्यांना हि शाळा चालवताना अनेक वेळा खुप आडचणी आल्या परंतू या आडचणी वर मात करत त्यानी हि शाळा सुरू ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे या समाजाचा जो पारधी समाजाच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे हा समाज चोरी करणाऱ्या पैकी एक या लहान मुलाच्या हातातली भिक मागण्याची वाटी काढून त्या मुलाच्या हातात पाटी देण्याच काम मी करत आहे आसे श्री सुधीर भोसले यांनी सांगितले यावेळी श्री रामजी नेहरकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी या शाळेच्या वतीने रामजी नेहरकर यांचा शाल फेटा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व त्यांना श्री सुधीर जी भोसले यांनी शाळेची आठवण म्हणून एक झाड व सोयरे वनचर हे पुस्तक देऊन स्वागत केले यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यां सोबत वाढदिवस साजरा करताना श्रीहारी पाटेकर. माजी सरपंच गव्हाण थडी . सिदेश्वर पाटेकर. उपसंरपंच गव्हाण थडी . पांडूरंग चौरे . ग्रा. प . सदस्य गव्हाण थंडी . कृष्णा नेहरकर ग्रा प . सदस्य गव्हाणथडी . राम जायभाये ग्रामपंचाय कर्मचारी महासघ जिल्हा उपाध्यक्ष बीड
श्री सखाराम पोहिकर . महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष तथा पत्रकार . शेख याशीनभाई भारतीय कम्युनिष्ठ पक्ष गेवराई तालुक सेक्रटेरी तथा पत्रकार यांच्या उपस्थितीत मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थांना . फळाचे वाटप करण्यात आले व या शाळेचे स्थापक श्री सुधीरजी भोसले यांच्याकडे वाढदिवसानिमित्त एक कटा गहु एक कटा तादूळ एक कटा साखर देण्यात आले या वेळी भोसले सर म्हणाले की आज आपण माझ्या या मुलासोबत आपला वाढदिवस आसा एक आगळा वेगळा साजरा केला व धुलीवंदनाचा आंनद आपण माझ्या विद्यार्था सोबत साजरा केला त्या बदल मी आपला आभारी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here