माझे अनैतिक संबंध नाहीत; खरं सांगूनही दिली भयंकर शिक्षा

0
108

माझे अनैतिक संबंध नाहीत; खरं सांगूनही दिली भयंकर शिक्षा

आधूनिक भारतात आजही भूत, जादूटोणा, अग्निपरीक्षा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. तेलंगणा येथून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.

एका तरुणाला आपल्या वहिनीशी असलेले संबंध सिद्ध करण्यासाठी विस्तवावरून चालण्यास सांगितलं आहे मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील बंजारूपल्ली या गावात ही घटना घडली आहे. या गावात एका कुटुंबातील भावा-भावांची भांडणं सुरू झाली. मोठ्या भावाने पत्नी आणि बारका भाऊ यांतील संबंधांवर संशय व्यक्त केला. त्यामुळे याचा न्यायनिवाडा करण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. त्यावेळी जमलेल्या सर्वांनी बारक्या भावाला तो खरं बोलत आहे की खोटं हे सिद्ध करण्यास सांगितले.

वहिनीशी माझे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत हे तो जिवाच्या आकांताने सर्वांना सांगत होता. मात्र कोणीही त्याचं ऐकत नव्हतं त्यामुळे शेवटी आपलं म्हणणं खरं असल्याचं लोकांना पटवून देण्यासाठी त्याने अग्निपरीक्षा दिली. यावेळी संपूर्ण गाव जमला होता. मैदानात जमिनीवर विस्तव टाकला होता. त्यात एक लोखंडी सळी ठेवण्यात आली. ही सळी तापून अगदी लाल झाली होती.

बारक्या भावाला तो खरं बोलत आहे हे सांगण्यासाठी ती सळी बाहेर काढायला सांगितले. त्याने देखील काळजावर दगड ठेवून मरणयातना सहन करत ती सळी बाहेर काढली. नंतर त्याला त्यावरून चालायला सांगितले. यावेळी तो अनवाणी पायांनी चालला. घटना पाहून सर्वजण हळहळ आणि संताप व्यक्त करत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here