12.7 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

गेवराई तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानचा पुढाकार- विजयसिंह पंडित

- Advertisement -

गेवराई तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी
नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानचा पुढाकार- विजयसिंह पंडित

- Advertisement -

नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून गेवराई तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रकल्प जलशारदा राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ११ गावांचा समावेश असून शुक्रवार, दि.३ मार्च रोजी सिरसदेवी येथे नदी सरळीकरण व खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. गेवराई तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकसहभागासह नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. यावेळी नाम फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक राजाभाऊ शेळके, कृषीभुषण शिवराम घोडके यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराई तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावामंध्ये प्रकल्प जलशारदा राबविण्यात येत आहे. जुन्या बंधाऱ्यांचे पुर्नजीवन करून नदी-नाल्यांचे सरळीकरण, खोलीकरण व विस्तारीकरण करण्याचे काम या प्रकल्पात करण्यात येत आहे. नाम फाऊंडेशनकडून या कामांसाठी पोकलेन मशिन उपलब्ध करण्यात आली असून इंधनाचा खर्च शारदा प्रतिष्ठान व लोकसहभागातून करण्यात येत आहे. इंधनासाठी ७५ टक्के खर्च शारदा प्रतिष्ठान व २५ टक्के खर्च लोकसभागातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ११ गावांचा समावेश असून उमापूर येथील अमृता नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर सिरसदेवी येथे मळूबाई वडा या नदीचे खोलीकरण, सरळीकरण व विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, नाम फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक राजाभाऊ शेळके आणि कृषीभुषण शिवराम घोडके यांच्या शुभहस्ते सिरसदेवी येथे कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच रविंद्र गाडे, उपसरपंच कैलास पवार यांच्यासह मान्यव उपस्थित होते. सिरसदेवी ग्रामपंचायत अंतर्गत पाडुळ्याची वाडी शिवारातील मळूबाई वड्याचे खोलीकरण, सरळीकरण व विस्तारीकरण सुरु करण्यात आले आहे. या कामामुळे सिरसदेवी, पाडुळ्याचीवाडी सह परिसरात जलक्रांती होणार असल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच रविंद्र गाडे यांनी नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

यावेळी धानोऱ्याचे सरपंच अविनाश राऊत, ॲड.पोपट मगर, ॲड.बालाजी सातपुते, भैय्या मगर, मनोहर गाडे, शिवाजी शिंदे, कैलास कदम, शेख खाजाभाई राजाभाऊ हेलकुटे, भगवान मोरे, अशोक पवार, जगदीश वेताळ, अमोल कदम, ॲड.हनुमंत शिंदे, दत्ता शिंदे, विकास शिंदे, भागवत कांबळे, शरद भोईटे, चत्रभुज वकटे, दामुअन्ना मोरे, भरत कदम, दिपक शिंदे, शेख नजीर, श्रीधर शिंदे, सुदर्शन गाडे, बाळू गाडे यांच्यासह सिरसदेवी व पाडुळ्याचीवाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles