बीड भीषण अपघात, आमदाराच्या मामाचा जागीच मृत्यू..

बीड : मणिक रायजादे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा आहेत. संदीप क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विद्यमान आमदार आहेत. ते, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास प्रवास करत होते. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गढी नजीक त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांची ब्रेजा कार चार ते पाच वेळा उलटली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रायजादे यांचा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून सिन्नरकडे पाठवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here