12.7 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

बीड बनावट लग्न लावून फसवणूक पोलीसाच्या हातावर तुरी तिने केले पलायन..

- Advertisement -

प्रसूतीसाठी कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून ती स्वच्छतागृहाकडे गेली व तेथून तिने पलायन केले. यावेळी दोन महिला अंमलदार सुरक्षेसाठी नेमल्या त्यांना चकमा देवून धूम ठोकली.

- Advertisement -

बीड : डिसेंबर महिन्यात बीडमधील अडीच लाख रुपये देऊन वसमत येथे मुद्रांकावर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. यात 11 आरोपींचा सहभाग आढळला होता. यात पूजा ही मुख्य आरोपी आहे.

- Advertisement -

लग्नाळू तरुणांची बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीची मास्टरमाईंड पूजा कचरू निलपत्रेवार प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.

मात्र, प्रसूतीआधीच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला अंमलदारांला चकामा देवून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles