विवाहबाह्य संबंधावरुन छळ गळफास घेऊन केली तीने आत्महत्या ..

पुणे : विवाहबाह्य संबंध ठेवून विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पती आनंद बधे, रंजना बधे, कल्याण बधे (सर्व रा. संकेत विहार, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा आनंद बधे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी हर्षदा हिची बहिण वर्षा राहुल शिवरकर (वय २२, रा. वाघोली) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण हर्षदा हिचा आनंद बधे याच्याबरोबर ५ मे २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून आरोपींनी संगनमत करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. आनंद बधे याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याविषयी हर्षदा हिने विचारणा केल्यावर तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून हर्षदा हिने १० फेब्रुवारी रोजी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here