15.2 C
New York
Tuesday, April 16, 2024

Buy now

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या अनेक गावातील रुग्ण सतत उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील डॉक्टर याठिकाणी उपस्थित राहत नाही. याबाबत परिसरातील गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. पण त्याकडे प्रशासनाने नेहमी दुर्लक्ष केले. त्यामुळे एका तरुणाचा आज जीव गेला असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

लातूर : लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, एका 22 वर्षीय तरुणाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही घटना असून, एका 22 वर्षीय तरुणाला विजेचा धक्का बसला होता. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी वेळ झाला. ज्यात त्याचा मृत्यू झाला असल्याच रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. आनंद निळकंठ भोकरे (वय 22 वर्षे, रा. तांबरवाडी) असे मृत तरूणांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद भोकरे हा तरुण रात्री आठ-साडेआठ वाजेच्या दरम्यान घरातील विजेचे काम करत होता. दरम्यान त्याला विजेचा धक्का बसला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ जखमी अवस्थेत लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुळे तिथे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र साडेआठ वाजता संपर्क केल्यावर त्या रात्री साडेदहा नंतर तिथे दाखल झाल्यात. मात्र तोपर्यंत आनंद भोकरे याने जीव सोडला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान या घटनेने रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा मुळे यांना जाब विचारला असता, उलट त्यांनी अरेरावी केली. तर वैद्यकीय अधिकारी यांनी अरेरावीची भाषा करत तुम्ही मला मारायला आलात का असा प्रतिप्रश्न करत रुग्णाच्या नातेवाईक यांना दम भरला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles