राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब शेकडे यांची नियुक्ती

राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब शेकडे यांची नियुक्ती

जिल्ह्यातील सरपंचांना एकत्र आणण्याचा निर्धार

आष्टी। प्रतिनिधी
देशातील सरपंचांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी बाबासाहेब शेकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील माजी सरपंच बाबासाहेब शेकडे यांची सर्वानुमते झालेल्या राज्यस्तरीय सरपंच मेळाव्यात नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयराम पलसानिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अमरावती येथील भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, प्रदेशाध्यक्ष प्रमोद पांडुरंग सांगोले ही नियुक्ती करण्यात आली.
बाबासाहेब सुभाष शेकडे आष्टी तालुक्यातील माजी सरपंच सक्रिय कार्यकर्ते असून बीड जिल्ह्यातील त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे.राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या अमरावती येथील राज्यस्तरीय सरपंच मेळाव्यानंतर लातूर जिल्ह्यातील सरपंचांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले शिवाय प्रत्येक सरपंच जबाबदारीने कार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे‌ बाबासाहेब शेकडे यांचा अनुभव व कार्य बघता त्यांच्यावर बीड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्यातील कार्यकारिणीची यावेळी घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयराम पनसालीया, कार्यकारी अध्यक्ष आदित्य उपाध्याय,राष्ट्रीय महासचिव मुकेश सकीया, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, रामनिवास राठोड, सुखदेव सिगराजी, ईश्वर साहु, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष प्रमोद सांगोले, सौ.शुभांगी विठ्ठल पडवळ महिला प्रदेशाध्यक्षा, महाराष्ट्र प्रभारी रामनाथ बोऱ्हाडे , मंगेश तायडे, नवनाथ जोंधळे , डॉ.शंकरराव ठाकरे, राजकुमार मेश्राम, माजी आयुक्त प्रभाकर सरदार, रामनाथ बोऱ्हाडे, नवनाथ जोंधळे, देवेंद्र गेडाम, निखिल काळे अमृत बसवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here