भाजपची गाव तेथे शाखा स्थापन करणार-पवन कुचेकर

भाजपची गाव तेथे शाखा स्थापन करणार–पवन कुचेकर

बीड : प्आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,भाजपाचे स्वाभिमानी नेते शरदजी झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यामध्ये गाव तेथे शाखा अभियान राबविण्यात येणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी व्यक्त केले आहे.
उपेक्षित,कष्टकरी,कामगार,मजुर,
ऊसतोड मजुर यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम पर्याय असुन लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे स्वाभिमानी नेते शरदजी झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाघाटावर हजारो युवकांचा जाहीर प्रवेश झाला असुन आगामी काळात स्वाभिमानी युवकांची मोट बांधून गाव तेथे शाखा अभियान राबविण्यात येणार असुन स्वाभिमानी युवकांनी गाव तेथे शाखा अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here