मुंबईतील डोंबिवली रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावर एक प्रेमीयुगुल किसिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील डोंबिवली येथील असल्याचा दावा केला जात असून त्यामध्ये युवक आणि युवती रेल्वे प्लॅटफॉर्मवरच किसिंग करताना दिसत आहेत. तर तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जाते. त्यातीलच काही जणांनी या युगुलांच व्हिडिओ शूट केला आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर तरुण-तरुणी किसिंग करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/GUAXXjdWS8
— Anish Bendre (@BendreAnish) March 12, 2022
दरम्यान, सध्या हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या तरूणांवर टीका केली असल्याचं या व्हिडिओवरील कमेंटमधून दिसतंय.