रात्री 2 वाजता स्टेशनवर आली; घरी जाण्यासाठी रिक्षा पकडला, पण वाटेत…

मुंबई : पहाटेच्या सुमारास घरी परत जाणाऱ्या एका महिलेला रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे. 29 जानेवारी रोजीला पहाटे 2 वाजता पीडित महिला काम आटोपून खोपोलीहून पनवेलला आली होती. त्यावेळी स्टेशनवर रिक्षाचालकाने ‘तुला घरी सोडतो सांगून रिक्षात बसविले मात्र घरी न नेता तिला बसस्थानकाचा मागे असलेल्या रेल्वे पठडीवर नेलं.

ठिकाणी त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीने तिला रेल्वे पठडीच्या पलीकडे असलेल्या एका पडीक इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेनं आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला पण या नराधमांनी पीडितेला मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर पीडित महिलेनं पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना नराधम रिक्षाचालक आढळून आला असता पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे एका नराधमाला बेड्या ठोकल्या असून एकजण अजूनही फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here