आरोग्यमंत्र्यांवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर…

ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नव किशोर दास यांची सार्वजनिक सभेला जात असताना एका पोलिसाने गोळ्या झाडल्या.

एएसआय गोपाल दास यांनी सुमारे चार ते पाच राऊंड गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे, ज्यात आरोग्यमंत्र्यांच्या छातीत मार लागला आहे. नव किशोर दास यांना सध्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्याचवेळी सोशल मीडियावर गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे.

नबा किशोर दास फायरिंगचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नव किशोर दास कारमधून खाली उतरताच काही लोक त्यांना हार घालू लागले. दरम्यान, हल्लेखोर कारच्या मागून येतो आणि गोळीबार करतो. त्याने 4-5 राऊंड फायर firing केल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव किशोर दास एका कार्यक्रमासाठी ब्रजराजनगर येथे आले होते. सूत्रांनी सांगितले की, नव दास वाहनातून बाहेर पडल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here