ताज्या बातम्या

पोलिसाने झाडल्या गोळ्या मृत्यूशी झुंज अपयशी! ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचे निधन


ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती अपोलो रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांच्यावर रविवारी (29 जानेवारी) गोळीबार करण्यात आला होता. ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात एएसआय गोपाल दास यांनी नाबा किशोर दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर आरोग्यमंत्र्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य मंत्री दास एका बैठकीला जात असताना ब्रजराजनगर शहरात ही घटना घडली. दास हे ओडिशातील प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *