संतापालेल्या पत्नीने पतीची जीभच कापली अस झाल काय?


पत्नीने केलेल्या आरोपांनुसार नुकतेच तिच्या आईचे निधान झाले आहे. “आईच्या निधनामुळे मी फार दुखात आहे. तसेच माझी तब्बेतही ठीक नव्हती. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मी फार थकले होते. मात्र असं असतानाही माझा पती काही ऐकायला तयार नव्हता,” असं या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पती आणि पत्नीमध्ये झालेल्या वादाचं हे प्रकरण आहे. पती आणि पत्नीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यावरुन वाद झाला. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की संतापालेल्या पत्नीने पतीची जीभच कापली. पोलिसांनी पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा सारा प्रकार शहरातील ठाकुरगंज (Thankurganj) परिसरामध्ये घडला. पत्नीवर बळजबरी करुन तिच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत होती. मात्र पत्नीचा याला विरोध होता आणि यावरुनच झालेल्या वादातून हा सारा प्रकार घडला.

वारंवार आपण नकार दिल्यानंतरही पती माझ्यावर जबरदस्ती करत होता. “तो माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. यावरुनच आमच्यात वाद झाला,” असंही ही महिला म्हणाली. या दोघांमध्ये वाद झाला. याच झटापटीमध्ये या महिलेने आपल्या पतीची जीभ कापली. या व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पतीच्या तक्रारीच्या आधारे ठाकुरगंज पोलिसांनी महिलेच्या विरोधात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पोलिसांनी दिलेल्या जबाबामध्ये पती जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. “मी शरीरसंबंध ठेवण्यासाठी तयार नव्हते. याच झटापटीदरम्यान पतीची जीभ कापली गेली, असं ही महिला म्हणाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक (पश्चिम) चिरंजीव नाथ सिन्हा यांनी या प्रकरणाचा पोलीस गंभीरतेने तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या या जखमी पतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थीर असून त्याला बरं वाटू लागल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here