मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कोल्हापुर : कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची हत्या करुन विजेचा शॉक लागल्याचा बनाव केला होता.

दोन मुली झाल्याने पत्नीचा पतीकडून छळ सुरू होता. अखेर पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आश्विनी एकनाथ पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय 28) असे या विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला आहे. अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती एकनाथ याने अश्विनीचा खून केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पती एकनाथ याला ताब्यात घेतले आहे.

करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केली असता एकनाथने अश्विनीच्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या घटनेने कोल्हापूर हादरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here