क्लिनिकला भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 5 जणांचा होरपळून मृत्यू


झारखंडच्या धनबादमधील एका क्लिनिकमध्ये भीषण आग लागली. दुर्घटनेत क्लिनिकमध्ये तैनात असलेल्या डॉक्टर (Doctor) दाम्पत्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटना धनबाद शहरातील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील हाजरा क्लिनिकमध्ये घडलीये. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.

अपघाताच्या वेळी डॉ. विकास हाजरा आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी आपापल्या खोलीत झोपले होते. बहुधा याच दरम्यान रुग्णालयातील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झालं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी क्लिनिकमध्ये 25 हून अधिक रुग्ण दाखल होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here