7.8 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

कोरोना कालावधीतील आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी प्रजासत्ताक दिनी “पीपीई किट आंदोलन “

- Advertisement -

कोरोना कालावधीतील आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी प्रजासत्ताक दिनी “पीपीई किट आंदोलन “
____
कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील विविध खरेदी गैरव्यवहार तसेच बीड जिल्हापरीषद अंतर्गत आरोग्य विभागातील वेतनवाढ गैरव्यवहार प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी गुरूवार रोजी “पीपीई किट “घालुन अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,मुबीन शेख,मुश्ताक शेख,बलभीम उबाळे, आदि सहभागी आहेत.

- Advertisement -

कोरोना कालावधीत बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी व राजकीय पुढारी यांनी संगनमतानेच आरोग्य विभागातील विविध खरेदी ऊदाहरणार्थ सीसीटीव्ही,विद्युत उपकरण,सॅनिटायझर उ, ,रेमडीसिवीर इंजेक्शन,बोगस केवळ कागदोपत्रीच खरेदी दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ होत असून वरील प्रकरणात (S.I.T.) उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून खरेदीचे ऑडीट करून संबंधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

- Advertisement -

बीड जिल्हापरीषद आरोग्य विभागातील इन्क्रिमेंटस (अतिरिक्त वेतनवाढ )गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा
___
बीड जिल्हापरीषद अंतर्गत आरोग्य विभागाने आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च एमसीआय (मेडीकल कौन्सिल ऑफ इंडीया)व राज्य पातळीवरील एमएमसी ( महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल ) या संस्थेकडे वैद्यकीय शिक्षणातील पदवीची नोंदणी नसतानाही जिल्हापरिषद आरोग्य विभागाने वैद्यकीय आधिका-यांना तब्बल सहा इन्क्रिमेंटस (आगाऊ वेतनवाढ) देऊन शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल तसेच जिल्हा आरोग्य आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी आधिकारात नसताना मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांचे आधिकार वापरून केलेल्या गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई करून अपहारीत रक्कम वसुल करून शासन तिजोरीत जमा करण्यात यावी.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles