बीड पोलिसानेच अल्पवयीन मुलीशी संसार थाटून अल्पवयीन पत्नीचा केल छळ

पोलीस अमलदाराकडून अल्पवयीन पत्नीचा छळ करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीडमध्ये पोलीस अंमलदाराचा अल्पवयीन मुलीशी विवाह, मागील दीड वर्षांपासून केलं संतापजनक कृत्य

बीड : बीडच्या गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सुशिक्षित लोकांकडून अल्पवयीन मुलीचा हा बालविवाह लावण्यात आला होता.

याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी पोलिसाने विवाह केलाच कसा? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून याप्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे. अल्पवयीन विवाहितेचा पोलीस पती मागील दीड वर्षांपासून तिचा छळ करत असल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराईत उघडकीस आली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस पती विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, विवाहिता 17 वर्षांची असूनही बालविवाहाचे कलम लावले नाही. विशेष म्हणजे ज्यांच्यावर कायदा राबविण्याची जबाबदारी आहे, त्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीशी संसार थाटल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अंमलदाराने अल्पवयीन मुलीशी विवाह केला असेल तर ते गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here