राजौरी जिल्ह्यात सापडले दोन बॉम्ब

राजौरी : सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान राजौरी जिल्ह्यातील जम्मू काश्‍मीरातील दसल गावातून दोन जीवंत आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.

राजौरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजता पोलिस, आर्मी फील्ड रेजिमेंट आणि सीआरपीएफ जवानांची तुकडी यांनी संयुक्तपणे दसल आणि त्याच्या लगतच्या परिसरात एक तपासणी मोहीम हाती घेतली होती त्यावेळी हे दोन आयईडी जप्त करण्यात आले. ते नंतर निकामी करण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधीतांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे शक्तीशाली बॉम्ब होते. अलिकडेच जम्मू काश्‍मीरात दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट घडवले होते.

त्यामुळे सुरक्षा दलांनी अशा स्वरूपाचे बॉम्ब अन्यत्र कोठे लपवून ठेवण्यात आले आहेत काय याची शोध मोहीम ठिकठिकाणी हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here