संक्रातीला गेलेली बायको परतलीच नाही, पतीने रात्रीत केला वेगळाच गेम!

बिहारच्या मधेपुरामधून (Madhepura) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीमुळे नाराज झालेल्या पतीने वैतागून केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पत्नी अचानक माहेरी निघून गेली होती. ती परतली नाही म्हणून पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. संतापलेल्या पतीने शुक्रवारी रात्री त्याचे गुप्तांग (private part) कापून घरातील देवाला अर्पण केले. कोणालाही यावर विश्वास बसणार नाही पण तरुणाच्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. मधेपुरा येथील रजनी नयानगर येथे हा सर्व प्रकार घडला आहे. 25 वर्षीय कृष्णा बासुकी याने हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर कृष्णाला आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर कृष्णाला मधेपुरा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करावे लागले आहे.

शुक्रवारी रात्री कृष्णाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरात पोहोचले. त्यावेळी कृष्णाने धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले होते. खोलीत सगळीकडे रक्तच रक्त दिसत होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले
कृष्णाचे लग्न गोलपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालोघ येथील एका मुलीसोबत झाला आहे. कृष्णाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. कृष्णा पंजाबमधील मंडी येथे कामाला असून तिथेच राहत होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून गावी परतला होता. मकर संक्रांतीनिमित्त त्याची पत्नी काहीच न सांगता माहेरी गेली होती. कृष्णाने तिला परत येण्यासाठी वारंवार विनंती केली होती. मात्र ती येत नव्हती. याचाच राग मनात धरुन कृष्णाने रात्री चाकूने त्याचे गुप्तांग कापले.

शेजारच्यांच्या म्हणण्यानुसार कृष्णाची मानसिक स्थिती ठीक नाही. कृष्णाचा भाऊ कैलास बास्की यांनी सांगितले की, “पत्नी परत न आल्याने त्याला काळजी वाटत होती. पत्नी सर्व मुलांना घेऊन माहेरी गेली होता. कृष्णआ पत्नीला वारंवार घरी ये असे सांगत होती. मात्र ती परत येत नव्हती. त्यामुळेच त्याने हा प्रकार केला आहे. त्याचा कोणाशीही वाद झालेला नव्हता. मात्र त्याने केलेल्या कृत्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here