क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हामाजलगाव

बीड मोठी बातमी पकडला 36 लाखांचा गुटखा


बीडच्या माजलगावात पकडला 36 लाखांचा गुटखा विभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार बच्चू यांनी एका रात्रीत 36 लाख 21 हजार 237 रुपयांचा गुटखा पकडला. माजलगाव शहरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती.

बीड: गुप्तहेराच्या माहिती आधारे जिजामाता नगर येथे सुनील कदम यांच्या घरी गुटखा विक्रीसाठी मालाची साठवून केलेली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी रात्री 11.00 च्या सुमारास सुनील अश्रुबा कदम यांच्या राहत्या घरी छापा टाकला आणि त्या ठिकाणी तपासणी करत त्यामध्ये त्यांना 2 लाख 13 हजार 667 रुपयांचा गुटखा आढळला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी सुनील कदम याची चौकशी केली असता हा माल कुठून आला असे विचारले. यावेळी त्यांनी मैदा येथून बाळू घुंबरे यांच्या आखाड्यावरून श्रीधर रवींद्र ठोंबरे यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले.

त्याच रात्री बाळू घुमरे यांच्या आखाड्यावर 2 वाजता जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर त्या ठिकाणी 34 लाख 7 हजार 600 रुपये किमतीचा गुटखा सापडला. माजलगावचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील आश्रुबा कदम , श्रीधर रवींद्र ठोंबरे, बाळू उमरी यांच्यावर 328 188, 272, 273,34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *