काँग्रेसला धक्का, बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला?

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक ( MLA MUKTA TILAK ) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २७ फेब्रवारीला निवडणूक होत आहे. ही निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) केली आहे.

राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील-ठोंबरे ( RUPALI THOMBARE ) यांनी पक्षाने आदेश दिल्यास कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे असे सांगितले आहे.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगण्याची शक्यता आहे. तर ही जागा आपल्याकडे कायम राखण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली असून काँग्रेसचा नेत्यांना आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली आहे.

पुण्यातील सहकार नगर येथे आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले असता तेथे त्यांची कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील गुलदस्त्यात असला तरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here