बीड भररस्त्यात 40 वर्षीय हॉटेल कामगाराची हत्या

बीडमध्ये खुनाची घटना उघडकीस आली आहे. आज ( २०, जानेवारी) शहरातील भर रस्त्यावर 40 वर्षीय हॉटेल कामगारांच्या खुनाची घटना घडली आहे. शहरातील धानोरा रोड परिसरात असणाऱ्या पालवन चौक परिसरात हा प्रकार घडला. दत्ता राधाकिशन इंगळे वय 40, रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मृत बीड शहरातील एका हॉटेल मध्ये काम करत होता. हा हत्येचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. दरम्यान शिवाजी पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here