कृषी महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी ऋषिकेश तळेकर (पी एस आय )याचा सत्कार संपन्न

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कृषी महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी ऋषिकेश तळेकर (पी एस आय )याचा सत्कार संपन्न

आष्टी : आष्टी येथील छत्रपती, शाहू ,फुले ,आंबेडकर कृषी महाविद्यालया चा माजी विद्यार्थी कुमार ऋषिकेश तळेकर हा 2012 ते 2016 या शैक्षणिक वर्षांमध्ये कृषी महाविद्यालय आष्टी मधून उत्तीर्ण होऊन सन 2018 च्या बॅचला महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा अंतर्गत पी एस आय या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला त्याची पहिली पोस्टिंग गडचिरोली येथे झाली असता विद्यार्थी समुपदेशन कक्ष, कृषी महाविद्यालय आष्टी ने त्याचा महाविद्यालयामध्ये सत्काराचे आणि महाविद्यालयातील पदवी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा चे मार्गदर्शन याचे आयोजन केले होते यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर.आरसुळ यांनी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने ऋषिकेश तळेकर यांचा सत्कार केला. ऋषिकेशने महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पदवी मध्ये असताना स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू करावा जेणेकरून पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते तसेच पी एस आय पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांचे पी एस आय ऋषिकेश तळेकर यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत सर, प्राचार्य डॉ. एस.आर. आरसूळ , टेक्निकल ऑफिसर इंजिनिअर पी. एन. जाधव, विद्यार्थी समुपदेशन कक्ष प्रमुख प्रा.पी.आर. काळे ,प्रा. एल. एस. मिसाळ , हे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी. आर. गुंजाळे यांनी केले तर आभार प्राध्यापक पी.आर. काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here