विद्यार्थीनीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मैत्रीण खोलीबाहेर जाताच या तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. काय आहे संपूर्ण बातमी – राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पाचव्या वर्षातील एका विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगळवारी दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये हा प्रकार समोर आला. युक्ती सुशिल बुजाडे, असे आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. ती मुळची चंद्रपूर येथील होती. सोमवारी नेहमीप्रमाणे ती दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वर्गात उपस्थित होती.

त्यानंतर होस्टेलमध्ये गेली. दुपारी तीन वाजता वारंवार आवाज देऊनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अन्य मुलींना संशय आला. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवल्यानंतर तिच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला.

तेव्हा अभ्यासाच्या टेबलवर उभा राहून लटकलेल्या अवस्थेत युक्ती आढळली. यानंतर तिला बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 13 जानेवारीलाच वाढदिवस केला साजरा – मागच्या आठवड्यात 13 जानेवारीलाच युक्तीने आपला 24वा वाढदिवस साजरा केला.

रविवारी संक्रांतीच्या दिवशी ती मैत्रिणींसोबत पतंग उडवण्यात सहभागी झाली होती. त्यानंतर आईशी फोनवर बोलली. सोमवारी मात्र ती बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलत होती. काही वेळा त्या संभाषणात आवाज वाढल्याचेही मैत्रिणींनी ऐकले.

मात्र, बोलणे झाल्यानंतर तिने हॉस्टेलमधील आपल्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

उच्चभ्रू कुटुंबातील युक्ती ही अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचे वडील नागपूरच्या आयटीआय विभागाचे सहायक संचालक आहेत आणि तिचे काका दमन पोलीस विभागात उच्च पदावर आहेत. तर भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे.

तिचे दोन्ही आयफोन पोलिसांनी जप्त केले असून तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तिने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here