बीड लिंबारुई देवी येथील तलावात बेपत्ता तरुणाचा मृतदेह

बीड : (पिंपळनेर ) बीड तालुक्यातील लिंबारुई देवी येथील तलावात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला. दिनेश श्रीमंत मते (वय 36, रा. लोणी शहाजनपुर) असे त्‍याचे नाव आहे.
दिनेश बेपत्ता झाल्याची नोंद बुधवारी (दि.१८) पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये झाली होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिंपळनेर जवळील लोणी शहाजनपूर येथील तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद बुधवारी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. आज सकाळी लिंबू येथील तलावामध्ये तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह दिनेश मते याचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी बीड पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी भेट देवून पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here