सासू-जावयाची प्रेमकहाणी: 40 वर्षीय महिला 27 वर्षीय तरुणासोबत फरार

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सिरोही : ज्या तरुणाला आपल्या मुलीचा हात द्यायचा त्याच्यासोबत महिला पळून गेल्याची घटना उघड झाली आहे. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील 40 वर्षीय सासू आणि 27 वर्षीय जावयाच्या प्रेमकथेत नवा खुलासा झाला आहे.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दोघांबाबत नवा दावा केला आहे. सासूसोबत फरार झालेल्या जावयाचे तिच्यावर पूर्वीपासून प्रेम असल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आपल्या प्रेयसीच्या घरात एन्ट्री मिळावी म्हणून त्याने महिलेच्या मुलीसोबत लग्न केले होते. दोघांनीही पोलिसांना चकित केले आहे.

आतापर्यंत त्यांचा शोध लागला नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील अनादरा पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा प्रेमप्रकरणाचा गुन्हा चांगलाच गाजत आहे. अनादरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सियाकरा गावात राहणारी जावई 1 जानेवारी रोजी आपल्या सासूसोबत पळून गेला. जावयाच्याच्या कृत्याची माहिती सासरच्यांना कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तेथे त्यांनी जावई नारायण जोगी यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता पोलीस या प्रेमी युगुलाचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांचा कोणताही मागमूस सापडलेला नाही.

सासऱ्याची नशा उतरल्यावर पायाखालची जमीनच सरकली जावयाने आपली प्रेयसी सासूला पळवण्यापूर्वी सासऱ्यांसोबत दारूची पार्टी केली.

सासरे दारूच्या नशेत असताना जावई प्रेयसी सासूसह पळून गेला. सासरे दारूच्या नशेत असताना त्यांना पत्नी आणि जावई घरी सापडले नाहीत. तपासात जावई पत्नीसह पळून गेल्याचे निष्पन्न झाले. जावई नारायण जोगी यांना तीन मुले आहेत.

जावई सासूपेक्षा 15 वर्षांनी लहान या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे अनादरा पोलिसांकडून सांगण्यात आले. आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या आपल्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची चारही मुले विवाहित आहेत. तर प्रियकर जावयालाही तीन मुले आहेत.

सासूसोबतच आरोपी जावयाने त्याच्या एका मुलीलाही सोबत नेले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. याआधी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातही सासू आणि जावयाची प्रेमकहाणी समोर आली होती. दोघांनी सामूहिक आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here