‘माझ्या मरणासाठी कुणावर काही आक्षेप घेऊ नका’ गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर : ‘माझ्या मरणासाठी कुणावर काही आक्षेप घेऊ नका’ असे मृत्युपूर्वी सुसाईट नोट लिहून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
त्रिशीला संतोष माटे (वय ४२) रा. स्वागत नगर, महाविष्णूनगर असे मृतक महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशीला यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही नवव्या वर्गात शिकत आहेत. त्यांचे पती खासगी प्रिटींग प्रेसमध्ये काम करतात.

सोमवारी सायंकाळी नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावला. ही घटना लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना मेडिकल रुग्णालयात नेले.

दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी ‘मी स्वतः आत्महत्या करीत आहे.

माझ्या मरणावर कुणाचा काही आक्षेप घेऊ नका’ असे सुसाईट नोटमध्ये लिहून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. त्रिशीला यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here