मुलगी झाली अन् आईचं भयानक कृत्य…

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडण्यात आले होते.
याप्रकरणी आरोपी आईला CCTV च्या आधारे मंचर पोलिसांनी तीन तासांत पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिका नकोशी झालेल्या जन्मदात्या आईचा शोध घेऊन CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी तिला अटक केली.

एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव…’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेच तिला नकोशी केलं…! आई गं.. तु वैरिणी का गं झालीस …! हेच शब्द तोडांतुन येत जरी नसले तरी डोळ्यात मात्र सहज दिसत होते.

मंचर शहारातील छत्रपती शिवाजी चौकातल्या कचरा कुंडीत पिशवीत गुंडाळुन नवजात बालिकेला नकोशी करणाऱ्या आईचा मंचर पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतले आहे. नराधम आईच्या पोटात वाढणारी ही बालिका सुंदर जगात आली. पण तिच्या आईला ती जन्मताच नकोशी झाली अनं जन्मताच तिला अनाथ व्हावं लागलं. तिच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच ही बालिका सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here