हशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचे आता लवकरच दिवाळे परकीय गंगाजळी ५ अब्ज डॉलरवर

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचे आता लवकरच दिवाळे निघणार आहे. पाकिस्तानची परकीय गंगाजळी गेल्या आठ वर्षांच्या सर्वात निच्चांकावर आली आहे.
पाकिस्तानकडे आता केवळ तीन आठवडे पुरतील एवढेच पैसे शिल्लक आहेत. परकीय गंगाजळी ५ अब्ज डॉलरवर येऊन राहिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत पाकिस्तान पुरते कोलमडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकार देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करत असले तरी पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार 30 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा (SBP) परकीय चलन साठा 5.576 अब्ज डॉलरच्या आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. पाकिस्तान प्रचंड विदेशी कर्जात बुडाला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने 245 अब्ज डॉलर्सच्या परकीय कर्जाची परतफेड केली आणि त्यामुळे परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली.

परकीय कर्जाची परतफेड करणे हे पाकिस्तानातील पीएमएलएनच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारसमोर सध्याचे सर्वात मोठे आर्थिक आव्हान आहे. IMF च्या पुढील मदतीसाठी पाकिस्तान सतत प्रयत्न करत आहे. शरीफ यांनी IMF प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची बातमी नुकतीच आली होती. शरीफ यांनी IMF प्रमुखांना पुढील हप्त्याबाबत नवीन करांच्या अटीवर पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली.

चार दिवसांनंतर शहबाज शरीफ जिनिव्हा परिषदेच्या निमित्ताने आयएमएफ प्रमुखांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानी रुपयाचे प्रचंड अवमूल्यन झाले आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा परकीय चलन साठा जानेवारी 2022 मध्ये $16.6 अब्ज होता, जो नंतरच्या महिन्यांत $11 अब्ज झाला आणि आता $5.576 अब्ज झाला आहे. आता तीन आठवडेच आयात करता येईल एवढे पैसे उरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here