अवैध सावकारी,सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड

गडचिरोली : गांधी वार्डात राहणार्‍या नेवलकर दाम्पत्याच्या घरावर सहकार विभागाने आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान धाड टाकून त्यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील मनोज मुरलीधर नेवलकर व मिना मनोज नेवलकर हे बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार पोलिस व सहकार विभागाला (Co-operative department) प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन सहकार व पोलिस विभागाने संयुतरित्या त्यांच्या घरी धाड टाकली. या धाडीत नियमबाह्य चालणार्‍या सावकारी व्यवहाराचे कागदपत्र पोलिसांनी जप्त केले असून, नेवलकर दांम्पत्याविरोधात सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत कारवाई केली.

यावेळी नेवलक यांच्या घरातून अवैध सावकारी संदर्भातील कोरे मुद्रांक पेपर, कोरे धनादेश, रेव्हनी टिकित लावलेल्या पवत्या, काही नोंदी असलेल्या चिठ्ठया, 10 पासबुक, अनेक व्यक्तींच्या नावे असलेली पॅनकार्ड, आधार कार्ड, विक्रीपत्र, मालमत्ता पत्र आदी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहे. जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही (Co-operative department) कारवाई करण्यात आली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी निबंधक कार्यालयाचे अधिकारी संजीव देवरे, हेमंल सौलाखे, सुशील वानखेडे, विजय पाटील, शैलेंद्र खांडरे, हेमंत जाधव, रुशीश्‍वर बोरकर, शालिकराम सोरते, शांताराम कन्नमवार, तुशार सोनुले, शैलेष वैद्य, प्रशांत फेमलवार, अनिता हुकरे, धारा कोवे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here