आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड – छगन भुजबळ

पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक पद, महापौर पद भूषविले. त्यांनी स्थानिक स्वराज्यसंस्थातून विधानपरिषदेत त्यानंतर विधानसभेतही त्यांनी आमदार म्हणून काम केल. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मतदारसंघातील नागरिक एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला कायमचे मुकले आहे.

मी व माझे कुटुंबीय जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here