मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या व्यक्तीने महिलेला मोबाईल नंबर मागितला त्यानंतर बेदम धुलाई..

कर्नाटकात महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीला चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. रस्त्यावर एका बेवड्याला महिला त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर चप्पलने मारहाण करताना दिसत आहेत.
धारवाड जिल्ह्यातील ही घटना असल्याचे सांगितले जात असून त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

इम्रान खान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक महिला बेवड्याला चापलांचा मार देत असून, तो व्यक्ती काहीच प्रतिकार करताना दिसत नाही.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या महिलांना अपशब्द बोलले तसेच, त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितले. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी लोकांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here