12.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

शिवशाही बसच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

- Advertisement -

बीड : बीड ( कडा )
बीड-नगर महामार्गावरील धानोरा जवळ दुचाकीस्वाराचा ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या शिवशाही बसच्या समोरासमोर धडकेत जागीच मृत्यू झाला.
सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. मृताचे नाव रामदास मिसाळ ( ४८ ) असे असून तो जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास मिसाळ हे जामखेडवरून नगरकडे दुचाकीवरून ( क्र. एम.एच १६, ए.के.२४३१) जात होते. बीड-नगर महामार्गावरील धानोराजवळ दुचाकीवरील मिसाळ समोरील गाडीला ओव्हरटेक करत होते. याच दरम्यान, पुण्यावरून नांदेडला जात असलेली शिवशाही बस (क्र. एम.एच.०९, ए.एफ.९७४९) समोरून आली. यावेळी दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रामदास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार शिवदास केदार , बाबुराव तांदळे, भरत माने, राजु कांबळे घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles